themurdererofrahulmohiteofpadegaonisarrested

esahas.com

पाडेगावच्या राहुल मोहितेचे खूनी लोणंद पोलिसांच्या जाळ्यात

पाडेगाव येथे तीन महिन्यांपूर्वी राहूल मोहीते याचा गळा चिरून अज्ञातांनी निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती. कसलाच पुरावा मागे न सोडता केलेल्या या खूनाच्या तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. लोणंद पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा दाखवत अखेर या खूनाचा उलगडा करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.