theminorgirlbecamepregnantduetotheabuse

esahas.com

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती

निर्जन ठिकाणी नेत १७ वर्षांच्या मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला. यातून पीडित मुलगी ७ आठवड्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकारानंतर वाई पोलिसांनी संबंधित तरूणाला अटक केली आहे. अभिषेक संतोष पाकिरे (रा. गडचीमाची, ता. वाई) असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.