themercurydroppedto13degreescelsiusfiresbrokeoutinplaces

esahas.com

सातारा गारठला! पारा १३ अंशापर्यंत घसरला, जागोजागी शेकोट्या पेटल्या

उत्तरेकडून थंडगार वारे वाहत असल्याने सातारा जिल्ह्यातही याचा परिणाम झाल्याने पारा घसरला आहे. शनिवारी सातारा शहराचे किमान तापमान १३.०२ अंशापर्यंत खाली आले होते. तर महाबळेश्वरचा पाराही १२.०५ अंश नोंदला गेला. यामुळे जिल्ह्यातील गारठ्यात आणखी वाढ झाली असून जागोजागी शेकोट्या पेटल्याचे दिसून येत आहे.