thegangwhichwasdemandingaransomofrs5lakhwasarrestedwithin12hours

esahas.com

विनयभंगाची धमकी देऊन पाच लाखाची खंडणी उकळणाऱ्या टोळीला बारा तासात अटक

इन्स्टाग्रामद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून विनयभंगाची तक्रार देण्याची धमकी देऊन पाच लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये एका युवतीला ताब्यात घेण्यात आले आहे. पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या या टोळीला अवघ्या बारा तासात जेरबंद करण्यात आले.