theencroachmentsinparangechowkwereremovedbytapridriversthemselves

esahas.com

पारंगे चौकातील अतिक्रमणे टपरी चालकांनी स्वतःहून हटवली

सातारा शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या उपायोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटिशीनंतर येथील पारंगे चौकातील टपरी चालकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले. यामुळे पारंगे चौकाकडून एसटी स्टँड आणि वाढे फाट्याच्या दिशेने जाणारा रस्ता आता मोठा झाला आहे.