thedriverofthebellcargoestothelaborcommissioner

esahas.com

घंटागाडीच्या चालकांची कामगार आयुक्तांकडे धाव

सातारा पालिकेच्या घंटा गाड्यांवर काम करणाऱ्या सुमारे 69 घंटागाडी चालकांनी ठेकेदाराने ईपीएफ प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी कामगार आयुक्तांकडे धाव घेतली आहे. ठेकेदाराची तक्रार करणारे लेखी पत्र कामगार आयुक्तांना सादर करण्यात आले असून या प्रकरणी न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.