thedeathofayouthisnotanaccident

esahas.com

युवकाचा मृत्यू अपघाती नव्हे, तर खूनच!

प्रशांत प्रकाश पवार (वय 23, रा. अनवडी ता. वाई) या युवकाचा अपघाती नव्हे तर त्याचा मारहाणीत खून झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मारहाण करणारे पारगाव, खंडाळा जि. सातारा येथील यादव भावकी असून मृत युवक नात्याने  त्यांचा पाहुणा लागतो. पोलिसांनी 5 संशयित आरोपींना अटक केली असून त्यातील दोघेजण माजी सैनिक आहेत.