thecoronareportoffourmembersofthesamefamilyin

esahas.com

खटावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

दिवसेंदिवस खटाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, आज एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शास्त्रीनगर येथील बाधित रुग्णांचा परिसर सील केला आहे.