thebailapplicationwillbeheardinthevadujcourt

esahas.com

आ. गोरे जामीन अर्ज सुनावणी वडूज न्यायालयातच होणार, जिल्हा न्यायालयाने अर्ज फेटाळला

मायणी (ता. खटाव) येथे मागासवर्गीय मृत व्यक्तीची बनावट सही व कागदपत्रे तयार करून जमिनीचा करार केल्याच्या गुन्ह्यात दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. त्याबाबत अटकपूर्व जामीन अर्ज वडूज न्यायालयाऐवजी अन्य न्यायालयात चालवण्यासाठी भाजपचे आ. जयकुमार गोरे यांच्यावतीने सातारा जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तो फेटाळला आहे. आता जामिनाबाबत वडूज न्यायालयातच सुनावणी होणार आहे.