theauthorityshouldtakeimmediatedecisionregardingnewtapconnectioninshahupuri

esahas.com

प्राधिकरणाने शाहूपुरीतील नवीन नळ कनेक्शनबाबत तातडीने निर्णय घ्यावा

शाहूपुरी भागातील जुन्या ग्राहकांना नवीन कण्हेर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून कनेक्शन शिफ्टिंग करुन देत असतानाच ज्या नागरिकांना नवीन कनेक्शन हवे आहे. त्यांना ती त्वरीत देण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेच्या उद्रेकास सामोरे जावे लागेल असा इशारा शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनास दिला. यावेळी अधिकाऱ्यांनी नवीन ग्राहकांना कनेक्शन देण्याबाबत आघाडीने मांडलेल्या मुद्यांशी प्राधिकरण सहमत असून याप्रश्‍नी आगामी काळात तातडीने निर्णय घेतला जाईल असे आश्‍वासन दिले.