takeadvantageoftheschemebycontactingthedistrictlegalservicesauthority

esahas.com

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून योजनांचा लाभ घ्यावा

न्याय हा सर्वांसाठी असून न्याय फक्त न्यायालयात मिळत नाही तर न्यायालयाच्या बाहेरसुध्दा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. तरी गरजवंतांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून योजनांची माहिती घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सातारा पालक न्यायमूर्ती मिलींद जाधव यांनी केले.