swordandmacheteattackonayouthinsatara

esahas.com

साताऱ्यात युवकावर तलवार, कोयत्याने प्राणघातक हल्ला

सातारा शहरातील बदामी विहिरीजवळ एका युवकावर तलवार, कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सहाजणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. संग्राम उर्फ लल्या भंडारे, तेजस मांढरे, नरु मांढरे, आदित्य गोसावी, यश जांभळे, धनू मांढरे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे असून यापैकी पाचजणांना अटक झाली आहे.