suspenseofpoliticalearthquakeinmumbaiinsatara

esahas.com

मुंबईतल्या राजकीय भूकंपाचा साताऱ्यात सस्पेन्स

शिवसेनेचे नगर विकास मंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे 17 आमदारांसह नॉट रिचेबल झाल्याने मुंबईमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या भूकंपामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे दोघे आऊट ऑफ कव्हरेज गेल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.