युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले तीन संशयित त्यामधील एक विधी संघर्ष बालक यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि भुईंज पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत रत्नागिरी येथून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
तीन वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित दऱ्या खटपट्या भोसले, रा.मालगाव, ता. सातारा याला स्थानिक गुन्हे शाखेने जांब, ता. वाई येथून अटक केली.
साताऱ्यातील मध्यवस्तीत असलेल्या गोलबाग येथील गोळीबार प्रकरणातील आणखी दोन संशयितांना जेरबंद करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे.
वाई, ता. वाई येथे तीन घरफोडी करणाऱ्या संशयिताला सहा तासात वाई पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शेखर उर्फ चिंग्या अशोक घाडगे, वय ३३ रा. सोनजाई नगर वाईन असे त्याचे नाव आहे.
घरफोडी, चोरी प्रकरणी एका संशयित इसमाला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अभिषेक गणेश आवारे वय ३०, रा. गेंडामळ सातारा असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.
संशयितरित्या दुचाकी बाळगणाऱ्या एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बीबी, ता. फलटण येथे दिवसा घरफोडी करून चोरी करणाऱ्या एका संशयिताला लोणंद वडगाव पोलिसांनी जेरबंद केले.
ट्रक, टेम्पो व इतर मालवाहतुकीच्या वाहनांचे थकीत हप्ते भरून चालवण्यासाठी करार करून घेऊन त्या वाहनांची परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱ्या दोन संशयितांना अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले.
काही दिवसापासून खटाव तालुक्यातील वडूज परिसरात भुरट्या चोर्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने वडूज पोलीस ठाण्याच्या पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. रात्रगस्त सुरू करण्यात आली होती. याच रात्रगस्तीमध्ये अंबवडे येथे पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली.
एटीएम कार्ड चोरून त्याचा वापर करत २ लाख रुपये लंपास करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. त्याच्याकडुन १ लाख ८० हजार रुपये हस्तगत करण्यात आले असुन अजित पांडुरंग नांगरे, वय ३६, रा. भादुले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
कार्वे, ता. कराड गावच्या हद्दीत कार्वे-कोरेगाव रस्त्यालगत ऊसाच्या शेतात डोक्यात दगड घालून युवतीचा (वय अंदाजे २५ वर्षे) निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. सोमवारी ३ रोजी सकाळी स्थानिक शेतकऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलीस पाटील व पोलीस पाटलांनी तात्काळ याबाबत कराड ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली.
जबरी चोरी व अपहरणाच्या गुन्ह्यातील संशयितांस कर्नाटकात जाऊन शिताफीने जेरबंद करण्याची अभिनंदनीय कामगिरी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांच्या पथकाने केली आहे. यासिन गुलाब झाडवाले (वय 48 वर्षे) माज यासिन झाडवाले (वय 26, दोन्ही रा. गांधी मार्केट, चिकोडी, ता. चिकोडी, जि. बेळगाव राज्य कर्नाटक) यांच्या मुसक्या आवळून अपहरण केलेल्या व्यक्तिची सुटका करून सातार्यात आणून शहर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
तडीपारीचा आदेश डावलून ओगलेवाडी परिसरात आलेल्या एका संशयितास कराड शहर पोलिसांनी अटक केली. पोलीस अधीक्षक यांच्याकडून कराड शहर पोलीस ठाणे अंतर्गत ओगलेवाडी दुरक्षेत्र हद्दीतील रेकॉर्डवरील ११ संशयीतांच्या टोळीला 6 महिन्याकरता तडीपार करण्यात आले होते. मात्र, तडीपारीचा आदेश डावलून ओगलेवाडी परिसरात आल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सागर सुभाष सुर्यवंशी (वय २५) रा. हजारमाची ता. कराड असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोडा व खंडणीच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या अनुराग राजेंद्र पाटील (रा. गोळीबार मैदान, सातारा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तसेच शिरवळ परिसरात गावठी पिस्टल विक्रीसाठी येणार आलेल्या सौरभ सुनिल नवले, देवदत्त जयपाल कांबळे (दोघेरा.गुंडगे,ता.कर्जत,जि.रायगड) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
घरासमोर चिकनचे खरकटे टाकण्याच्या कारणावरून एक वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा राग मनात धरून एकाचा तलवार आणि कोयत्याने निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सातार्यातील बोगदा परिसरात मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडली.
जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.