strictactionshouldbetakenagainstthosewhodefameidols

esahas.com

मूर्ती विटंबना करणार्‍यांवर कडक कारवाई करावी

सदर बझार येथील हनुमान मंदिर याठिकाणी काही समाजकंटकांकडून हनुमान मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे मूर्ती विटंबना करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर भारतीय जनता पार्टी व हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व त्यांचे सहकारी यांनी त्या ठिकाणी जाऊन दुग्धाभिषेक करून मूर्तीचे शुद्धीकरण केले व महाआरती करण्यात आली.