stonethrowingonatpadikaradbusinsurlighat

esahas.com

सुर्ली घाटात आटपाडी-कराड बसवर दगडफेक

सुर्ली, ता. कराड येथील घाटात आटपाडी-कराड बसवर अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागले आहे. याप्रकरणी संबंधित एसटी कर्मचाऱ्यांनी सदर बस तक्रार देण्यासाठी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणली होती. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.