spontaneousresponseofthebestqualityfromallcornersofmaharashtra

esahas.com

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोनी मराठी वाहिनीवर येत्या दि. २२ नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या इंडियन आयडल मराठी  या कार्यक्रमाची सध्या फार चर्चा आहे. अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा अशी टॅगलाइन हे ब्रीदवाक्य असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. ही संस्था  करते आहे. प्रादेशिक भाषेत इंडियन आयडल पहिल्यांदाच सुरू होणार असून त्याला साजेसे असे परीक्षकही लाभले आहेत.