specialcampaignforantinarcoticsactioninthedistrictinmay:superintendentofpoliceajaykumarbansal

esahas.com

जिल्ह्यात मे महिन्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी विशेष मोहिम : पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल

जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस विभाग व इतर विभागांच्या समन्वयातून 1 मे ते 31 मे 2022 या कालावधीत जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली.