जावली तालुक्यातील अवैध दारुविक्रीमुळे नागरिकांच्या संसाराची वाताहात होत आहे. या अवैध धंदेवाल्यांविरोधात आम आदमी पक्षाने दंड थोपटले असून येत्या 10 एप्रिलपर्यंत हे धंदे बंद न झाल्यास आम आदमी पक्षाच्यावतीने पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायरन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!