shocking:thebabywasabductedbyaprivatelenderformoney

esahas.com

धक्कादायक : पैशांसाठी खासगी सावकाराने बाळालाच पळवून नेले

खासगी सावकारीच्या व्यवहारातून खासगी सावकार असलेल्या दांम्पत्याने चक्क दीड महिन्याची मुलगीच घेवून जात बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवली आहे. मुलगी नेण्यास गेले असता परत आला तर पाय काढून टाकीन, जीवे मारीन अशी धमकी ही खासगी सावकार दांम्पत्याकडून दिली जात असून याबाबत पोलिसात तक्रार करुन देखील त्या छोट्या बाळ असलेल्या मुलीची आई न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.