shivajimuseumshouldbestartedinafurnishedbuilding

esahas.com

सुसज्ज इमारतीमध्येच शिवाजी संग्रहालय सुरू व्हावे

मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहलायाची नवीन वास्तू सुसज्ज अशी आहे. त्याच इमारतीत हे संग्रहालय सुरु व्हावे. अशी मनोमन इच्छा आम्हा शिवभक्तांची आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नव्या इमारतीचे हस्तांतरण करावे, जेणेकरुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या संग्रहालयाला चांगले दिवस येतील.