तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा सत्कार समारंभ क्रीडाई सातारा यांनी उद्या दि.१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता येथील द फर्न रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये घेतला असून तो समारंभ तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त" 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येकांच्या घरावर, शासकीय कार्यालयांवर तिरंगा झंडा फडकेल. या हर घर झंडा उपक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रित आयुष्यमान भारत योजना जिल्ह्यातील 5 शासकीय व 21 खाजगी असे एकूण 26 रुग्णालयामध्ये राबविण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत 11 हजार 900 पेक्षा जास्त कोविड-19 रुग्णांना उपचाराचा मोफत लाभ देण्यात आला आहे. तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 996 आजार व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत 231 असे एकूण 1209 आजारांवर उपचार केले जातात. याबाबतचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला.
ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह सर्व यंत्रणा प्रशासनाने सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ज्या नागरिकांनी अद्यापर्यंत पहिला डोस तसेच पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेतला नसेल अशा नागरिकांनी लवकरात लवकर कोविड लसीकरणाचा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
महाविद्यालयातील एकही पात्र विद्यार्थी मतदार नोंदणी पासून वंचित राहणार नाही यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विशेष शिबीरांचे आयोजन करावे. या शिबीरांमध्ये जास्तीत जास्त व्होटर हेल्पलाईन ॲपचा वापर करुन नव मतदारांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 0 ते 18 वयोगटातील बालकांना "अर्थसहाय्य योजना" या योजनेंतर्गत कोविड कालावधीत कोविड संसर्गामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक (आई व वडील) हे मृत्यू पावलेले आहेत, अशा बालकाच्या नावे एकरकमी पाच लाख रुपये रक्कम मुदत ठेव म्हणून जमा करण्याची ही योजना आहे. या योजनेंतर्गत ही एकरकमी मुदत ठेव रक्कम संबंधित बालक व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या नावे असणाऱ्या सामायिक बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात मतदार नोंदणी पुररिक्षण कार्यक्रम 2022 मोहिमेस आरंभ झाला असून त्यानुसार एकत्रीकृत प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या मोहिमेत जिल्हय़ातील 18 वर्षांपुढील नवीन मतदारांनी नोंदणी करावी. यासाठी नोव्हेंबर महिन्यात 13, 14, 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मोहिम राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.