sewagegutterconstructionatdhorgalliisofinferiorquality

esahas.com

ढोर गल्ली येथील सांडपाण्याचे गटर बांधकाम निकृष्ट दर्जाचे

सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सात येथील ढोर गल्लीमध्ये सांडपाण्याच्या गटाराचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाची वर्कऑर्डर नसतानासुद्धा हे काम झाल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष अशोक तपासे यांचे चिरंजीव अनिकेत तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला. ढोर गल्ली येथे झालेल्या बेकायदेशीर कामकाजाचा पर्दाफाश त्यांनी पत्रकार परिषदेत केला.