seizureofpaintingbrushmadefrommongoosehairinkarad

esahas.com

कराडात मुंगसाच्या केसांपासून बनवलेले पेंटींग ब्रश जप्त

बुधवार दि. १५ रोजी वनविभाग कराड व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो यांनी संयुक्तपणे कारवाई राबवत कराड आणि मलकापूर येथे एकाचवेळी ५ रंग व्यवसायिक दुकानदारांवर छापा टाकला. यामध्ये सर्व दुकानात मुंगूस या वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षण असलेल्या वन्यप्राण्याच्या केसांपासून बनवलेले ब्रश मोठ्या प्रमाणात सापडले. या पाचही दुकानातून वनविभागाने 1 हजार 735 ब्रश जप्त केले आहेत.