scrapshoponfireatnandlapur

esahas.com

नांदलापूर येथे भंगाराच्या दुकानाला आग

मलकापूर - नांदलापूर येथील भरवस्तीतील भंगारच्या दुकानाला आज पहाटे अचानक भीषण आग लागली. शेजारीच असलेला टँकरही त्यात पेटला. आगीमध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाला तासभर केलेल्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीमध्ये दुकान व साहित्य भस्मसात झाले.