savitakashidsentencedtosimpleimprisonmentforfouryears

esahas.com

सविता काशीद हिला चार वर्ष साध्या कैदेची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार करत तिचा खून केला. त्यानंतर मुलाच्या आईने त्यास मदत केल्याप्रकरणी नेर, ता. खटाव येथील सविता निलेश काशिद वय ३४ या महिलेला वडूज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ४ वर्षे साधी कैद व १ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.