सातारा जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी मोहीम राबवली. त्यावेळी सुमारे ३० जण उशिरा आल्याचे आढळले. त्यांना समज दिली असून, दुसऱ्यांदा सापडल्यास कारवाई होणार आहे. तर ठराव समितीत विविध विषयांवर चर्चा झाली.
ओबीसी आरक्षणावर जाहीर झालेल्या निकालानंतर जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार गट-गण यांची अंतिम रचना जाहीर झाली असून यात ७ नव्या गटांची भर पडली आहे. गणपतीनंतर किंवा दिवाळी अगोदर ह्या निवडणुका पार पडल्या जातील असे दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना 27 जून रोजी जाहीर होणार आहे. यासंदर्भात दाखल झालेल्या शंभर हरकतींची सुनावणी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात नुकतीच पार पडली. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे राजकीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा : सातारा जिल्हा कोरोना संसर्गाच्या पाशातून आताशी कुठे बाहेर पडण्याच्या मार्गावर असतानाच अस्मानी संकटाने सर्वसामान्यांचे आणि शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी आशेने प्रशासनाकडे पाहत असतानाच सातारा जिल्हा परिषदेने लाखो रुपयांची उधळपट्टी करीत सो कॉल्ड अभ्यास दौरा आयोजित केला आहे. या अनाठायी खर्चाविरोधात माहिती अधिकार क...