sambarhuntinginthebufferzoneofthesahyadritigerreserve

esahas.com

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये सांबराची शिकार

नाव, ता. पाटण गावातील काही गावकर्‍यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये सांबर या वन्य प्राण्यांची शिकार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी हेळवाक वन्यजीव विभागाने धडक कारवाई करत ५ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून मांस व अन्य मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच त्यांना न्यायालयत हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सूनावली आहे.