riflecartridgeswerefoundintheexcavationofthemunicipalbuilding

esahas.com

पालिका इमारतीच्या खोदकामात आढळून आली रायफलीची काडतुसे

सातारा जिल्हा परिषदेसमोरील कल्याणी इस्टेटमध्ये सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीसाठी सुरू असलेल्या खोदकामात रायफलीच्या १ हजारहून अधिक काडतुसांचा साठा सापडला आहे. ही काडतुसे कोणत्या काळातील आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, त्यादृष्टीने ती पुरातत्व विभागाकडे दिली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.