researchcentershouldbeinsatarawithmemorialofchhatrapatishahumaharaj

esahas.com

छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासह संशोधन केंद्र साताऱ्यात व्हावे

छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज याचे भव्य स्मारक वढू तुळापूर येथे करण्याची घोषणा राज्य सरकारने केली त्याबद्दल त्यांचे स्मारक त्यांच्या कर्तृत्वाला शोभेल साजेसे असे करावे, याशिवाय शंभूपुत्र आणि संपूर्ण भारतभर मराठा साम्राज्याची पताका फडकविणारे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचेही भव्य स्मारक पुणे येथे शनिवारवाडा आणि साताऱ्यात संशोधन केंद्र व्हावे, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.