report

esahas.com

महाबळेश्‍वरच्या माजी नगराध्यक्षांच्या भ्रष्ट्राचाराचा अहवाल शासनाकडे सादर

महाबळेश्‍वरच्या माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या महाबळेश्‍वर नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानात भ्रष्ट्राचार केल्याप्रकरणी शिवसेना युवासेना उप जिल्हाप्रमुख सचिन वागदरे यांनी नगरविकास खात्याकडे केलेल्या तक्रारीवरुन माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व तत्कालीन मुख्यधिकारी अमिता दगडे पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सातारा यांना देण्यात आले होते.

esahas.com

गोडवलीत आणखी 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; प्रशासनाकडून बाधित परिसर सील

महाबळेश्‍वर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, पाचगणी शहरानजीक असलेल्या गोडवली गावात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी रात्री गोडवलीतील 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.  पाचगणी शहरातही आणखी 3 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून, तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 494 झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

esahas.com

जिल्ह्यात 496 जणांचे अहवाल कोरोनाबाधित; नऊ बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 496 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 9 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

esahas.com

खटावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

दिवसेंदिवस खटाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, आज एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शास्त्रीनगर येथील बाधित रुग्णांचा परिसर सील केला आहे. 

esahas.com

महाबळेश्‍वरमध्ये आणखी 13 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

महाबळेश्‍वर शहरात आज 13 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये पालिकेचे नाक्यावरील कर्मचारी, स्वच्छता विभागाच्या काही कर्मचार्‍यांचा समावेश आहे. आजअखेर शहरातील बाधितांची संख्या 184 झाली असून, 58 जण कोरोनामुक्त आहेत तर महाबळेश्‍वर तालुक्यात आजअखेर 375 कोरोनाबाधित असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.  

esahas.com

जिल्ह्यात 337 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 नागरिकांचा मृत्यू

जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

esahas.com

जिल्ह्यात 396 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  आठ नागरिकांचा मृत्यू

जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

esahas.com

नवनीत राणांना पुन्हा कोरोना; पालिकेनं केलेल्या चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह

आता मुंबई महापालिकेनं नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची कोरोना चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं बोललं जात आहे. 

esahas.com

खटाव तालुक्यातील तीस रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

खटाव तालुक्यातील सुमारे 38 रुग्णांच्या घशातील स्वॅबची तपासणी करण्यात आली होती. गुरुवारी रात्री यापैकी तीस रुग्णांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, आठ रुग्णांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. तर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या राजाचे कुर्ले येथील 44 वर्षीय पुरुष रुग्णाचा एकमेव अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युन्नूस शेख यांनी दिली.

esahas.com

म्हसवडमध्ये आणखी तिघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह 

गेल्या काही दिवसांपासून म्हसवड परिसरातून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असतानाच काल पुन्हा तिघे कोरोनाबाधित झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत असल्याने व वरकुटे-मलवडीची साखळी म्हसवडमध्ये पाय पसरू लागल्याचे दिसून येत आहे. तर म्हसवड येथील आरोग्य विभागातील कर्मचारीच बाधित झाल्याने म्हसवड पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने हादरून गेले आहे.

esahas.com

महाबळेश्‍वर शहरातील 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

शहरात आज 32 कोरोना रुग्णांची भर पडली असून, यामध्ये पालिकेतील 7 कर्मचार्‍यांचा समावेश असल्याने पालिका प्रशासन चांगलेच हादरले आहे. 32 रुग्णांमुळे शहराची कोरोना रुग्णांची शतकाकडे तर तालुक्याची द्विशतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. पालिका कर्मचार्‍यांच्यामुळे पालिकेचे कामकाज काही दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.