relieftoprojectaffectedfarmersduetotheeffortsofsrinivaspatil

esahas.com

खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नामुळे प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा

खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील येळगाव व गोटेवाडी येथील बंधा-यांच्या भूसंपादन मोबदल्यापोटी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने 2 कोटी 33 लाख 37 हजारचा निधी सातारा विभागाकडे वर्ग केला आहे. हा निधी मिळाल्याने प्रकल्पग्रस्त शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.