सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेने सातारा शहराच्या विकासासाठी शुक्रवारी 325 कोटी 51 लाख रुपयांच्या अंदाज पत्रकाला मान्यता दिली. हद्दवाढी नंतर नव्याने तयार झालेल्या क्षेत्रांच्या पायाभूत विकासासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र महसुल वाढी साठी कोणतेही विशेष प्रयत्न झाल्याचे जाणवले नाही. शहराच्या हद्दवाढी नंतरही मालमत्ता कराचे उत्पन्न 14 कोटी 50 लाख रुपये दर्शविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होते.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!