privatepassengerbusoverturnedatkhambatkighat

esahas.com

खंबाटकी घाटात खासगी प्रवासी बस उलटली; चार जखमी

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात सातारा बाजूकडे जाताना पहिल्याच वळणावर खासगी बस संरक्षक कठडा तोडून रस्त्याच्या खाली दहा फूट खोल पलटी झाली. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले आहेत. बाजूला खोल दरी नसल्याने मोठा अनर्थ टळला.