45 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने अत्यंत दिमाखात शनिवारी रात्री झालेल्या अंतिम फेरीमध्ये पटकावली. त्याने लढतीमध्ये पाच विरुद्ध चार गुणांनी मुंबईच्या विशाल बनकर यांचा शेवटच्या दीड मिनिटांमध्ये दुहेरी पट काढून पराभव केला. यानंतर पृथ्वीराज समर्थकांनी त्याला उचलून घेत आखाड्यामध्ये एकच जल्लोष केला.
19 वर्षांच्या पृथ्वीराज पाटील यांनी जिंकला महाराष्ट्र केसरीचा किताब. पृथ्वीराज पाटील यांना 2022 चा किताब मिळाला आहे. गादी विभागात अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज पाटीलने हर्षद कोकटेचा पराभव केला होता. विशाल बनकर विरुद्ध पृथ्वीराज पाटील असा अंतिम लढत झाली. यात पृथ्वीराज पाटीलने विशाल बनकर यांचा पराभव केला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!