pregnantforestrangerbeatenbyformersarpanch

esahas.com

गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

सातारा तालुक्यातील ठोसेघर परिसरात पळसवडे येथे बुधवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. पळसवडेच्या वनसमितीचे अध्यक्ष असलेल्या माजी सरपंचाने वनविभागातील महिला वनरक्षकालाच गंभीर स्वरुपाची मारहाण केली. या घटनेत ती महिला वनरक्षक गंभीर जखमी झाली असून ती गर्भवती असताना देखील तिला मारहाण करणार्‍या माजी सरपंचाविषयी समाजात तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.