अल्पशा आजाराने येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या सदाशिव यादव यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. याच दरम्यान जिल्हा रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये एका रुग्णाला दोन्ही निकोप डोळ्यांची आवश्यकता होती. याबाबतची माहिती देऊन वैद्यकीय पथकाने यादव कुटुंबीयांना सदाशिव यादव यांचे मरणोत्तर नेत्रदान करावे, अशी विनंती केली असता यादव कुटुंबीयांनी त्याला तात्काळ होकार दिल्यानंतर सदाशिव यादव यांचे नेत्रदान झाले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!