policepatilofchinchanervandancaughtinbriberytrap

esahas.com

चिंचणेर वंदनचा पोलीस पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात

अदखलपात्र गुन्ह्यामध्ये प्रतिबंधक कारवाईत मदत करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेताना चिंचणेर वंदन, ता. सातारा येथील पोलीस पाटील चंद्रकांत तुकाराम बर्गे याला सोमवारी सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईने सातारा महसूल विभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे.