कामगार हा बांधकाम व्यवसायाचा कणा असून, कामगारांच्या प्रती ऋण म्हणून त्याच्या पाल्यांसाठी चड उखढ हा कॉम्प्युटर कोर्स पूर्ण केल्यास त्याला मदत करण्याची भूमिका बिल्डर्स असोसिएशन घेणार आहे. दरम्यान, याद्वारे यावर्षी किमान 50 कामगारांच्या पाल्यांचे प्रशिक्षणासाठी मदत करणार असल्याचे चेअरमन रणधीर भोईटे यांनी सांगितले.
जेव्हा पोटाला काहीच मिळणार नाही तेव्हा लोकं माणसाला मारून खातील, असं ऐकीवात होतं. या म्हणीला तंतोतंत खरे ठरावे याची प्रचिती फलटणकरांना बघावयास मिळाली. लॉकडाऊनमध्ये सर्वत्र बंद असल्याने पोटाची भूक शमविण्यासाठी काहीच मिळेना म्हणून एका मनोरुग्णाने सरणावर जळत असलेल्या अर्धवट कोविडग्रस्त मृतदेहाचे लचके तोडून आपली भूक शमविण्याचा प्रयत्न केला आहे. अंगावर शहारे आणणार्या या घटनेला पाहून मन सुन्न होत आहे.
बदामी रंगाच्या आयशर प्रो कंपनीचा चार चाकी टेम्पो क्र. (एमएच 50/8333) या गाडीत गोवंशीय जातीची अंदाजे एक ते दोन महिने वयाची बारा जर्सी गायची वासरे कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने डांबून ठेवलेली मिळून आली असून, तौफिक इम्तियाज कुरेशी (रा. कुरेशीनगर, फलटण) यांच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र पशु छळ अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडून सुमारे 10 लाख 24 हजारांचा मुद्देमाल फलटण शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अंगातील सुप्त गुणांना ओळखून त्यांना वाव दिला पाहिजे. शिक्षणा बरोबरच खेळालाही महत्त्व देऊन आपणास प्रगती करता येते. केवळ खेळात प्रावीण्य मिळवून ही थेट प्रशासकीय सेवेत काम करण्यास संधी मिळते,’ असे उद्गार पुणे प्रादेशिक उपविभागाचे वाहन निरीक्षक संभाजी गावडे यांनी काढले.
तालुक्यातील विविध क्षेत्रांतील वजनदार व धनिकांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करणार्या ‘हनी ट्रॅप’ टोळीची फलटण तालुक्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू असून, पोलीस विभागही यापुढे अशा टोळ्यांवर कारवाई करण्याच्या मनस्थितीत असून गोपनीय पद्धतीने सर्व प्रकारची माहिती घेण्यासही सुरुवात झाली आहे. पुढील काळात निश्चितच या प्रकारच्या टोळ्यांवर कारवाई होणार आहेत.