सिव्हिल हॉस्पिटल परिसरात भरणार्या मेडिकल कॉलेजच्या पार्किंग मधून 20 हजार रुपये किमतीची सुझुकी एक्सेस मोटार सायकल अज्ञाताने चोरून नेली. हा प्रकार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या दरम्यान घडला आहे.
सिव्हिल हॉस्पिटल च्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
दुकानासमोर चारचाकी वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून तीन जणांनी एकाला शिवीगाळ, दमटाटी करून मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.
मलकापूर नगरपालिकेच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. याबाबत नागरिकांकडून अनेकदा पालिका व पोलिसांना निवेदने देण्यात आली. होती. त्यानुसार मलकापूर पालिका व शहर पोलीस प्रशासनाने सेवा रस्त्यांवर 'नो पार्किंग झोन' जाहीर केला असून सोमवारपासून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसही पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील सेवा रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
पुर्वीच्या प्रस्तावातील प्रत्यक्षात उपयोगात येणाऱ्या पार्किंगच्या जागा दोन दिवसांत नागरीकांच्या उपयोगाकरीता उपलब्ध करुन द्या, आम्हाला यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे सांगायला लावू नका, अश्या खरपुस शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला कानपिचक्या दिल्या.
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पार्किंग निश्चित केले असतानाही रुग्णालयात कामानिमित्त आणि नातेवाइकांना भेटायला येणार्या नागरिकांकडून वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग केले जात असल्यामुळे सुरक्षारक्षक आणि नागरिकांमध्ये वादाच्या घटना घडू लागल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील पार्किंगची समस्या कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.