pardeshipakshiaagaman(barheded)

esahas.com

सूर्याचीवाडी तलावात परदेशी पक्ष्यांची हजेरी

दरवर्षी मायणी, येरळवाडी, सूर्याचीवाडी, कानकात्रे या तलावात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात अनेक देशी-विदेशी पक्षी आपली उपस्थिती लावतात. यावर्षी पक्षांचे आगमन लांबले आहे. वरील चार तलावांपैकी मायणी-कातरखटाव रस्त्यालगत सूर्याचीवाडी गावच्या हद्दीतील तलावात येणार्‍या अनेक परदेशी पक्ष्यांत बार-हेडेड गुज उर्फ (अन्सर इंडिकस/पट्ट कादंमब/पट्टे वाला हंस) या सर्वाधिक उंचीवरून स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांबरोबरच इतर अनेक सुंदर पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे पक्षी निरीक्षक, पर्यटकांच्यात आनंदाचे वातावरण आहे.