otherwise...universityrescuemovementacrossthestate

esahas.com

अन्यथा... राज्यभरात विद्यापीठ बचाव आंदोलन

महाविकास आघाडी सरकारने सुधारित केलेल्या विद्यापीठ कायद्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची शक्यता आहे. तसेच विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप होऊ नये,  यासाठी हा कायदा  मागे घ्यावा. अन्यथा, राज्यभरात विद्यापीठ बचाव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर यांनी दिला.