opportunitytoopensukanyasamrudhiaccountforgirlsbelow10years

esahas.com

10 वर्षाखालील मुलींसाठी सुकन्या समृध्दी खाते उघडण्याची संधी

सातारा पोस्ट ऑफिसद्वारे आंतरराष्ट्रीय कन्या दिवसाचे औचित्य साधून लहान मुलींचा सन्मान करण्यासाठी  मुलींचे “सुकन्या समृध्दी खाते” उघडण्यासाठी  विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. दि. 31 डिसेंबर 2021 पर्यंत सातारा जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या गावापर्यंत पाहोचून 10 वर्ष वयोगटापर्यंतच्या सर्व मुलींचे सुकन्या समृध्दी खाती उघडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे डाक विभागाच्या प्रमुख अपराजिता म्रिधा यांनी सांगितले.