onesentencedtorigorousimprisonmentformolestingaminorgirl

esahas.com

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला सश्रम कारावासाची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने आत्माराम लक्ष्मण पाचपुते, रा. पाचपुतेवाडी, ता. पाटण याला कलम ३५४ नुसार दोषी धरून १ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास, पोक्सो कलम ८ नुसार ३ वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १ महिना साधा कारावास आणि पोक्सो कलम १० नुसार ५ वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारवास अशी शिक्षा ठोठावली.