onekilledoneseriouslyinjuredinunidentifiedvehiclecrash

esahas.com

पांगरी येथे ट्रक व दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर

शिरवळ येथे कामावर हजर राहण्यासाठी निघालेल्या गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील दोन युवकांच्या दुचाकीचा व ट्रकचा पांगरी (माण) येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. यामध्ये सूर्यकांत लाला जाधव (वय ३०) याचा जागीच मृत्यू झाला, तर महेश बबन कट्टे (वय 27) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

esahas.com

वाढे फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, तर एकजण गंभीर

शहराजवळ वाढे फाटा येथे महामार्गावर गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. तर त्याच्यापाठीमागे बसलेल्या एकजण गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.

esahas.com

उंब्रजजवळ अपघातात एक ठार, एक गंभीर

उंब्रज, ता. कराड येथे पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रज येथे दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये एकजण जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी 31 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.