onediesduetohighvoltagepowerlineshock

esahas.com

उच्‍च दाबाच्‍या वीज वाहिनीचा शॉक लागल्‍याने एकाचा मृत्यू; पत्‍नी आणि दोन मुले जखमी

दिवाळीसाठीची रोषणाई करताना उच्‍च दाबाच्‍या वीज वाहिनीचा शॉक लागल्‍याने चिमणपूरा पेठेतील कारंडबी नाका परिसरात राहणाऱ्या सुनील तुकाराम पवार (वय ४०) यांचा काल रात्री मृत्‍यू झाला. या दुर्घटनेत मृत पवार यांची पत्‍नी आणि दोन मुले जखमी झाली असून त्‍यांच्‍यावर उपचार सुरु आहेत.