सोशल मीडियावर खोटी कागदपत्रे बनवून साखर कारखान्याची बदनामी होईल, अशी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी २६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत कारखान्याच्या प्रशासन विभागातील क्लार्क रणजीत कदम यांनी फिर्याद दिली आहे. ओमकार अरुण साळुंखे रा. रेठरे खुर्द ता. कराड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!