niteshraneremandedinpolicecustodytillfebruary4

esahas.com

नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत रहावे लागणार आहे. कणकवली कोर्टाकडून पोलीस कोठडीचा निर्णय घेण्यात आला आहे.