nidhalpaausnews

esahas.com

उत्तर खटाव भागात वादळी वारा, गारांचा अवकाळी पाऊस

गुरुवारी दिवसभर खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोळ-डिस्कळ परिसरात सोसाट्याचा वार्‍यासह गारांचा पाऊस झाला. पुसेगाव निढळ परिसरात दिवसभर वादळी वातावरण होते. त्यामुळे शेतकर्‍यांची त्रेधातिरपीट उडाली. सध्या शेतामध्ये ज्वारी, गहू काढायला आला आहे. त्याचे मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. आंब्याच्या मोहोर गळून पडला आहे. छोटे-छोटे झाडाला लागलेले आंबे गळून पडल्यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.