namonamoinfourstates

esahas.com

चार राज्यांमध्ये नमो नमो; एका राज्यात झाडू ठरला जादुई

पाच राज्याच्या निवडणुकांच्या निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये सत्तेची सेमिफायनल भाजपने जिंकली आहे. पाच पैकी चार राज्यात भाजपने आपला करिष्मा कायम ठेवलाय. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगीराज पहायला मिळेल. गोवा, उत्तराखंड, मणिपूरमध्येही भाजपचा दबदबा कायम आहे. तिकडे पंजाबच्या निकालाने पूर्ण राजकारण बदललंय. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने इतर पक्षांचा सुपडासाफ केला आहे.